मुंबई : बँक ऑफ बडोदाने त्यांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने निवडक कालावधीसाठी देशांतर्गत किरकोळ ठेवींच्या व्याजात 30 बेसिस पॉइंट्स (BPS) पर्यंत वाढ केली आहे.
यासोबतच बँकेने आपल्या बडोदा तिरंगा प्लस FD योजनेच्या व्याजदरातही वाढ केली आहे. या एफडीचा कालावधी 399 दिवसांचा आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, नवे व्याजदर 12 मेपासून लागू झाले आहेत.
ज्येष्ठ नागरिकांना आता एफडीवर 7.55 टक्के दराने व्याज मिळणार आहे. दोन कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर सर्वसामान्य नागरिकांना 7.25 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के दराने व्याज मिळणार आहे.