उतरत्या वयामध्ये आपल्याला दर महिन्याला एक ठराविक रक्कम मिळावी ज्यामध्ये आपल्या गरजा आणि खर्च भागेल याचा विचार करून गुंतवणूक केली जाते. पती पत्नी दोघांनाही मिळून 10 हजार रुपये महिना मिळेल अशी एक योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे.
या योजनेमध्ये महिन्याला पतीला 5 आणि पत्नीला 5 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. ज्याचं वय 40 वर्षांपेक्षा जास्त आहे त्याला या योजनेचा कोणताही फायदा घेता येणार नाही.
६० व्या वर्षी हातात पैसे असायला हवेत यासाठी आताच Atal Pension योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात करा. भारतीय नागरिक जास्तीत जास्त 5000 रुपयांचा लाभ घेऊ शकतात. तुम्ही ही योजना अगदी 500 ते हजार रुपयांपासून सुरू करू शकता.
तुम्ही 1000 ते 5000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळवू शकता. वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पेन्शन मिळणार आहे. 18 ते 40 यामध्ये जर तुमचं वय असेल तर तुम्हाला अटल पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार आहे.
जर 5 हजार रुपये महिना तुम्हाला पेन्शन हवं असेल तर तुम्हाला 250 रुपये महिन्याला जमा करावे लागणार आहेत. 1000 रुपये पेन्शन हवं असेल तर 18 वर्षांच्या युवकाला 42 रुपये प्रत्येक महिन्याला जमा करावे लागणार आहे. इथे गुंतवलेले पैसे बुडत नाहीत ही या योजनेची खासियत आहे.
तुम्हाला बँकेत ऑनलाईन खातं देखील उघडण्याची सुविधा आता आहे. तुम्ही ऑनलाईन खातं उघडून KYC आणि नॉमिनी करू शकता. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर द्या सगळी माहिती भरून झाली की तुम्ही सबमिट करा.