तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी बातमी खूप महत्त्वाची आहे. कंपनीने आपले प्लॅन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार 9 सर्कलमध्ये प्री-पेड रिचार्ज महाग झाले आहे.
2/ 7
या दरवाढीनंतर आता ग्राहकांना 99 रुपयांच्या रिचार्जसाठी 155 रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच आता ग्राहकांना एका रिचार्जवर 56 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.
3/ 7
वाढत्या महागाईमुळे कंपनीने हा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. कंपनीने रिचार्जचे दर वाढवले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला बजेटआधीच मोठी कात्री लागणार आहे.
4/ 7
भारती एअरटेलने आपल्या मिनिमम रिचार्जमध्ये या रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केली आहे. दरवाढीच्या घोषणेनंतर आता ग्राहकांना कमीत कमी 155 रुपयांचे रिचार्ज करावा लागणार आहे.
5/ 7
यापूर्वी कंपनीने आपल्या 7 सर्कलमध्ये दरवाढ जाहीर केली होती, तर आता 2 सर्कलमध्ये वाढ करण्यात आली आहे. एकंदरीत, कंपनीने आपल्या 9 सर्कलमध्ये प्लॅनच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी कंपनीने ओडिशा आणि हरयाणामध्ये दरवाढ केली होती.
6/ 7
टेलिकॉम कंपन्यांना रिचार्ज प्लॅनची किंमत का वाढवावी लागते, हा प्रश्न आहे. खरं तर या क्षेत्रातील ३ पैकी २ कंपन्या नफ्यासाठी धडपड करत आहेत. विशेषत: व्होडाफोन-आयडिया कर्जाच्या प्रचंड ओझ्याखाली आहेत.
7/ 7
रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलची नेट डेट-टू-एबिटडा देखील तीन पटीने जास्त आहे. आर्थिक पातळीवर संघर्ष करूनही कंपन्या सातत्याने ५जी नेटवर्कमध्ये गुंतवणूक करत आहेत. स्पेक्ट्रमच्या लिलावानंतर जिओ आणि एअरटेल देशभरातील विविध भागात ५जी सेवा सुरू करत आहेत.