मुंबई : तुमच्याकडे आता फक्त 27 दिवस उरले आहेत. तुम्ही अजूनही या गोष्टीला गांभीर्याने घेत नसाल तर अजूनही वेळ गेली नाही.
तुम्ही आताच चेक करणं आवश्यक आहे. नाहीतर तुम्हाला 10 हजाराचा दंड भरावा लागू शकतो. एवढंच नाही तर तुमचं पॅनकार्ड कचऱ्यात फेकून द्यावं लागेल.
तुम्ही अजूनही जर हे केलं नसेल किंवा तुमच्या मित्र मैत्रिणींमध्ये कोणी आधार पॅन लिंक करायचं शिल्लक असेल तर अजूनही वेळ गेली नाही.
तुम्ही 1 हजार रुपये दंड भरून आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करू शकता. तुमच्याकडे फक्त शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत.
यासाठी तुम्हाला income tax च्या ऑनलाईन साईटवर भेट द्यायची आहे. तिथे तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करू शकता. याशिवाय तुम्ही तिथे आधीच लिंक केलं आहे की नाही ते तपासू शकता.
याशिवाय तुम्ही जवळच्या आधार कार्ड सेंटरला भेट देऊ शकता. तिथे जाऊन तुम्हाला आधार पॅन लिंक करता येईल.