दूरसंचार विभागाने कंपन्यांना 5G बाबात महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. रनवेवर दोन किलोमीटर पर्यंत 5G सेवा देऊ नयेत असे निर्देश दिले आहेत. धावपट्टीच्या ९१० मीटरपर्यंतची सेवा कंपन्या देणार नाहीत. 5 जी सेवा विमानांच्या अल्टिमीटरच्या सिग्नलवर परिणाम होतो. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर विमानात बसले असाल तर फाईव्ह जी सेवा मिळणार नाही हे यावरून स्पष्ट होतं.
भारतातील अनेक विमानतळ खूप लहान आहेत जिथे सेवा देणे कठीण आहे. दूरसंचार कंपन्यांनी 5 जी सेवा जोरात सुरू करण्याची घोषणा केली आहे. भारती एअरटेलने देशातील पाच विमानतळांवर 5 जी सेवा देण्याची घोषणा केली आहे. 5 जीच्या सिग्नलमुळे विमानाच्या अल्टिमीटरवर परिणाम होतो, असे विमानवाहतूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दूरसंचार विभागाने डीजीसीएला विमानाचे अल्टिमीटर बदलण्याच्या सूचना दिल्या आहेत.
याचा परिणाम कम्युनिकेशन सिस्टिमवर देखील होऊ शकतो. मात्र अजूनही याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास सुरू आहे. याबाबत अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन एडमिनिस्ट्रेशन यांनी FAA ला इशारा दिला आहे. 5G चा परिणाम विमानं जेव्हा उड्डाण करतात तेव्हा उंचावर पोहोचल्यावर त्याचा परिणाम रिडिंगवरही होऊ शकतो. दुसरं म्हणजे आल्टीमीटर्सला याचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.