वर्षाला 29 लाख कमावणारे कुटुंबही गरीब; या देशात गरिबीची व्याख्याच विचित्र; फक्त 10% लोक BPLमध्ये
Poverty Line in America: संपूर्ण जगात गरिबी ही एक मोठी समस्या आहे, विशेषतः काही देशांमध्ये गरीब लोक प्रत्येक मूलभूत गरजांसाठी संघर्ष करतात. वेगवेगळ्या देशांमध्ये, असुरक्षित कुटुंबांना उत्पन्नाच्या आधारे दारिद्र्यरेषेखाली ठेवण्यात आले आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की असा एक देश आहे जिथे वार्षिक 29 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणारी कुटुंबे दारिद्र्यरेषेखाली येतात. तुम्ही विचार कराल की हे कसे शक्य आहे? जाणून घेऊया त्या देशाचे नाव आणि तेथील गरिबीचे काय नियम आहेत?
अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली आणि विकसित देश आहे, पण इथेही गरिबीची समस्या आहे. अमेरिकेने गेल्या 50 वर्षात बरीच प्रगती केली आहे आणि अनेक युद्धे जिंकली आहेत. पण, तरीही गरिबी पूर्णपणे हटवता आलेली नाही. (इमेज-शटरस्टॉक)
2/ 6
अमेरिकन सरकारच्या म्हणण्यानुसार, 1970 मध्ये देशातील 12.6 टक्के लोकसंख्या गरीब होती. मात्र, 1990 मध्ये 13.5 टक्के आणि 2010 मध्ये 15.1 टक्के, 2019 मध्ये हा आकडा 10.5 टक्क्यांवर आला आहे. (प्रतिमा- ट्विटर @Kpop_Herald)
3/ 6
खरंतर, अमेरिकेतील 5 सदस्यीय कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न $35,801,29 लाखांपेक्षा कमी असल्यास, त्यांना दारिद्र्यरेषेखाली ठेवले जाते. डॉलरचा हिशोब रुपयात केला तर ही रक्कम 29 लाख आहे.
4/ 6
अशा परिस्थितीत 29 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाचे दारिद्र्यरेषेखाली येणे ही भारतीयांसाठी आश्चर्याची बाब आहे.
5/ 6
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या एका पेपरनुसार, अत्यंत गरिबी, ज्याची जागतिक बँकेने व्याख्या केली आहे की क्रयशक्ती समता (PPP) च्या दृष्टीने US $1.9 किंवा त्यापेक्षा कमी उत्पनावर जगणे. (प्रतिमा- मनीकंट्रोल)
6/ 6
जागतिक बँकेच्या मते, दररोज 2.15 डॉलर किंवा त्यापेक्षा कमी कमावणारे लोक अत्यंत गरीब मानले जातील. भारतीय रुपयात ही रक्कम 167 रुपये इतकी आहे. पूर्वी दररोज 145 रुपयांपर्यंत कमाई करणाऱ्यांना अत्यंत गरीब मानले जायचे. वार्षिक आधारावरही हिशोब केला तर ही रक्कम 60 हजार रुपये येते. (प्रतिमा- मनीकंट्रोल)