मुंबईसह कोकण आणि रायगडमध्ये पावसाने धुमशान घातले आहे. आज यवतमाळसह विदर्भात पावसामुळे हाहाकार माजला आहे. आज हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य करण्यात आले.
यवतमाळच्या महागाव तालुक्यातील आनंद नगर गावाला नदीच्या पुराचा पाण्याचा वेढा घातला. त्यामुळे येथील नागरिकांनाच बचाव कर्य सुरू करण्यात आले. त्यासाठी एअर फोर्सचे हेलिकॉप्टर बोलावण्यात आले होते.
हेलिकॉप्टरद्वारे बचावकार्याला सुरुवात केली मात्र वातावरणातील बदलामुळे हेलिकॉप्टराद्वारे करण्यात येणारे बचावकार्य थांबविण्यात आलं. मात्र sdrf चे बचाव कार्य सुरू आहे.
तर, यवतमाळच्या महागाव तालुक्यातील आनंतवाडी येथील अडकलेल्या 65 नागरिकांना sdrf च्या पथकाने रेस्क्यू करून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. अद्यापही पुराच्या वेढ्यात 30 नागरिक अडकून असून त्यांचे बचवकार्य सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी दिली.