वर्धा, 3 जून : पतीच्या दीर्घायुष्य व हाच पती जन्मोजन्मी मिळावा यासाठी आज खाकी वर्दीतील महिला पोलिसांनी कर्तव्यातून वेळ काढत वडाच्या झाडाची पूजा केली. (नरेंद्र मते, प्रतिनिधी)
2/ 7
रुढीपरंपरेला जपत उखाणे घेत पतीच्या दीर्घायुष्यासाठी देवाला साकडे घाणाऱ्या खाकी वर्दीतील या सावित्री लोकाभिमुख ठरल्या हे मात्र विशेष.
3/ 7
घरसंसार सांभाळत महिलांना नोकरीच्या ठिकाणी कर्तव्य पार पाडावे लागते. अशातच येणारे सण, रुढीपरंपरा जपणं कठीण जातं.
4/ 7
मात्र, त्यातही थोडा वेळ काढीत महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस मुख्यालयातील वडाच्या झाडाची पूजा केली.
5/ 7
पतीला दीर्घायुष्य लाभू दे, घरी सुखशांती लाभू देत अशी प्रार्थना सर्वांनी मिळून केलेली पाहायला मिळाली.
6/ 7
पोलीस म्हटलं की कामाचा वाढता ताण, त्यातूनही वेळ काढून पतीच्या सुखासाठी वडाच्या झाडाखाली येऊन पूजा करणं, यातच खरा आनंद असल्याची भावना या महिला कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
7/ 7
या खाकी वर्दीतील सावित्रींचे फोटो सध्या जिल्ह्यात चांगलेच व्हायरल होत आहेत.