अविनाश कानडजे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने पावसाचा अलर्ट दिला आहे. शेतकऱ्यांना काढणीला आलेलं पिक, फळांची काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे.
मराठवाड्यात 22 मे दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता.
मराठवाड्यात कमाल तापमानात हळूहळू दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता. मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढला, जमिनीतील ओलावा झाला कमी.
नैऋत्य मोसमी पावसाच्या आणखी काही भागात पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. पुढील 3 दिवसात दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र, अंदमान निकोबार बेट इथे पावसाची शक्यता आहे.
मान्सून केरळमध्ये चार जून रोजी दाखल होण्याची शक्यता आहे. दरवर्षी केरळमध्ये 1 जूनला पावसाचं आगमन होतं. यंदा मात्र त्याला तीन दिवस उशीर होणार असल्याचा अंदाज आहे.