राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. मुंबईत ऊन आणि पावसाचा लपाछपीचा खेळ चालू आहे. तर उपनगरांमध्ये मध्ये मध्ये पावसाच्या जोरदार सरी येत आहेत.
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी आज वादळी वाऱ्यासह पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पुढचे 48 तास उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भासाठी महत्त्वाचे आहेत. तिथे अति मुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पुढील 4, 5 दिवस पाऊस संमिश्र राहील, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.