मुंबई : राज्यात आधीच पावसानं जोर धरला आहे. 30 तासांपेक्षा जास्त काळ मुसळधार पावसाचं थैमान सुरू आहे. रस्ते शेती पाण्याखाली काही ठिकाणी गेली आहे. तर शहरांमध्ये सखल भागात पाणी साचून नुकसान झालं आहे. वाहतूकही मंदावली आहे.
कोकणाला आज ऑरेंज उद्या येलो तर पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गुहागर मध्येही मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी. समुद्राला उधाण आल्याने नागरिकांना समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचं आवाहन देखील केलं आहे. प्रशासनाकडूनही अलर्ट जारी करण्यात आला आहे.
3 आणि 4 जुलै रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.