मुंबई : 48 तासांपासून मुंबई, ठाणे, उपनगर, नवी मुंबईसोबत तळ कोकणात पावसाने कहर केला आहे. जरा थांबण्याचं नाव घेत नाही. एकतर धो-धो नाहीतर रिपरिप पावसाची सुरूच आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे.
मान्सूनच्या आगमनाने हवेत गारवा निर्माण झाला आहे. मात्र अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.
दुसरीकडे तळ कोकण म्हणजे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पुढचे तीन दिवस अति मुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
4 आणि 5 जुलै रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातही अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईसह उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी.