एकीकडे राज्यात मान्सून येईल अशी आशा असताना मात्र पुढचे दोन दिवस पुन्हा हिटवेवचा इशारा देण्यात आला आहे. पावसाची प्रतीक्षा थोडी जास्त करावी लागू शकते. दिवसेंदिवस उष्णता वाढत चालली आहे. उकाड्याने हैराण झालेले लोक आता पावसाची आतूरतेनं वाट पाहात आहेत.
पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पुन्हा एकदा हिटवेवचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे आणि उपनगरात कमालिची उष्णता वाढली आहे. उकाड्याने लोक हैराण झाले आहेत. तर तळकोकणात अधून-मधून पाऊस हजेरी लावत असल्याने काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
4 जूनला कोकण, गोवा आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे विकेण्डला घराबाहेर जाण्याचा प्लॅन असेल तर छत्री रेनकोट घेऊन घराबाहेर पडा नाहीतर पावसात भिजायची वेळ येईल.
5 जूनला कोकण, गोवा, मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.