वर्ध्यात सूर्य आग ओकत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील तापमान 42 अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचले असून नागरिक प्रचंड उष्णतेने हैराण झाले आहेत.
वाढत्या उष्णतेमुळे वर्दळीचे रस्तेही दुपारच्या सुमारास ओस पडत आहेत. तर बाजारपेठेतही गर्दी होताना दिसत नाही.
कामानिमित्त बाहेर पडणारे लोक थंड पेयाच्या ठिकाणी थांबताना दिसत आहेत. उष्णतेपासून थंडावा मिळावा म्हणून लिंबू सरबत आणि थंड पेय पिण्याकडे लोकांचा कल आहे.
वर्ध्यात काल 17 मे रोजी किमान तापमान 27 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.
आज 18 मे रोजी देखील वर्ध्यात किमान तापमान 28 तर कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.
नागरिकांनी दुपारच्या सुमारास बाहेर पडायचे असल्यास योग्य ती खबरदारी घ्यावी. डोक्यावर टोपी, रुमाल घेऊन आणि शरीर झाकूनच बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.