वर्धा जिल्हा शिक्षण, प्रशिक्षण संस्थेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बाला(बिल्डिंग इज अ लर्निंग एड) उपक्रमांतर्गत 'वारली पेंटिंग' उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षकांनी वारली पेंटिंगचे धडे दिले.
तीन दिवसांच्या कार्यशाळेत शिक्षकांच्या मागणीनुसार एकूण 8 बॅचेस घेण्यात आल्या. तसेच जिल्ह्यातील विद्यार्थी, जिल्हा कोषागार कार्यालय कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.
विशेष म्हणजे वर्धा जिल्हा कारागृहातील बंदीवानांसाठी देखील ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यांनीही सुंदर वारली चित्रे रेखाटली.
या उपक्रमामुळे वर्ध्यातील शिक्षक आपल्या वर्गात विद्यार्थ्यांना वारली पेंटिंग शिकवत आहेत. तसेच ही चित्रे काढण्याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळत आहेत.
वर्ध्याच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाच्या भिंतींवर वारली पेंटिंग अकर्षक रित्या रेखाटण्यात आले आहेत. या चित्रांमुळे परिसराची शोभा अधिकच वाढली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, दांडी यात्रा, राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ, बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, संत गाडगे बाबा आदी महामानवांची चित्रे रेखाटण्यात आली आहेत.
तसेच वारली एक्सप्रेस, पाणी वाचवा, झाडे जगवा, शिका आणि शिकवा, निपुण भारत, शिक्षणाचे अधिकार, असे चित्र रेखाटून सामाजिक संदेशही देण्यात आला आहे.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या तिसऱ्या वर्षाच्या निमित्ताने शिक्षण मंत्रालय भारत सरकारकडून कॉफी टेबल बुक प्रकिशात करण्यात येतआहे. यात भारतातील 6 नवोपक्रमांचा समावेश आहे.
या कॉफी टेबल बुकमध्ये महाराष्ट्रातील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, वर्धाच्या 'वारली पेंटिंग' या उपक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. या ई-कॉफी टेबल बुकचे प्रकाशन लवकरच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.