मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. यामुळे अंबरनाथ-बदलापूर रेल्वे वाहतूक सकाळी ठप्प झाली आहे. त्याचबरोबर उल्हासनगरलाही पावसाचा दणका बसला आहे.
शहरातल्या सीएचएम कॉलेजजवळही पाणी साचलंय. या कॉलेजकडं जाणाऱ्या पुलाच्या रस्त्यावर पाणी साचलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा घरचा रस्ता पकडावा लागला.