मार्च महिन्यापासून राज्यातील तापमानाने उच्चांक गाठला आणि यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. उष्णतेचा हा वाढता पार अद्यापही कायम असल्याचं दिसून येत आहे. त्यातच राज्यातील काही भागांत अवकाळी पाऊसही (unseasonal Rain) पडत आहे. कधी कडाक्याचं उन तर कधी अवकाळी पाऊस या विचित्र परिस्थितीमुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. आता हवामान विभागाने पुढील 3 दिवस काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा (Heat wave) इशारा दिला आहे.
तसेच 10 जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस (IMD predicts unseasonal rain) पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या 10 जिल्ह्यांत पाऊस होण्याची शक्यता आहे.
तर विदर्भातील काही जिल्ह्यांत पुन्हा उष्णतेची लाट पहायला मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा 40 अंशांहून अधिक पहायला मिळत आहे. अहमदनगर 42.1, जळगाव 43.1, मालेगाव 43.0, सोलापूर 42.0, औरंगाबाद 40.7, परभणी 42.4, नांदेड 41.6, बीड 42.0, अकोला 44.2, अमरावती 42.08, बुलढाणा 41.03, ब्रम्हपुरी 44.2, चंद्रपूर 44.2, गोंदिया 42.0, नागपूर 43.6, वाशिम 42.5, वर्धा 43.8.
हवामानाचा अंदाज 21 एप्रिल - कोकण - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
मराठवाडा - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता. विदर्भ - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.