सोलापूरचे डॉ. सुनिल खट्टे, निशिकांत कलेल, अमित माटे, डॉ. हर्षवर्धन जोशी यांनी 74 वा प्रजासत्ताक दिन अनोख्या पद्धतीनं साजरा केला आहे.
2/ 6
या डॉक्टरांच्या टीमनं उत्तराखंडमधील केदारकंठा हे शिखर सर करून 12500 फुटांवर 74 भारतीय ध्वजांचे ध्वजतोरण फडकवून आणि राष्ट्रगीत गात प्रजासत्ताक दिन साजरा केला.
3/ 6
मुंबईचे गिर्यारोहक वैभव ऐवळे २०१८ पासुन दरवर्षी स्वतंत्रतादिन ध्वज तोरण फडकावून साजरा करतात. त्यांच्याकडून प्रेरणा घेत ही मोहीम आखल्याचे डॉ. निशिकांत यांनी सांगितले.
4/ 6
उत्तराखंडमधील ‘केदारकंठा’ हा ट्रेक नेहमीच सर्व गियार्रोहकांना खुणावतो. गिर्यारोहण हा साहसी क्रिडाप्रकारात गणला जातो. निसर्गाच्या आव्हानातील धोके पत्कारून मार्गक्रमण करणे हे धाडसाचे असते.
5/ 6
गिर्यारोहकांसमोर एकूण बारा हजार पाचशे फूट उंचीवर चढाई करण्याचे आव्हान होते. अनेक अडचणींना सामोरे जात हे आव्हान त्यांनी पूर्ण केले.
6/ 6
सोलापूरच्या गिर्यारोहकांनी हे सर्व आव्हान पूर्ण करून प्रजासत्ताक दिनी आपले ध्येय गाठले आहे.