असिफ मुसराल, प्रतिनिधी सांगली, 24 फेब्रुवारी : राज्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक बातमी सांगली जिल्ह्यातून समोर आली आहे. सांगलीच्या आष्टा येथे तीन वाहनांचा तिहेरी अपघात घडला आहे. एक जण ठार तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. बागणी रोडवरील शिंदेमळा येथे हा अपघात घडला आहे. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न मध्ये हा अपघात घडला आहे. स्कॉर्पिओ, एर्टीगा आणि इंडिका या तीन वाहनांमध्ये हा अपघात झाला आहे. या अपघातात कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथील माजी सरपंच संतोष पाटील हे ठार झाले आहेत. तर इतर जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी पलूस तालुक्यातील नागठाणे आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील आहेत. यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असून अधिक तपास आष्टा पोलीस करत आहेत.