उदय जाधव, प्रतिनिधी रायगड, 26 जुलै : इर्शाळवाडीमध्ये रात्री साखरझोपेत असताना दरड कोसळली आणि अख्खं गाव जमीनदोस्त झाली. काही लोक सुदैवानं वाचले तर जवळपास 16-17 घरं दरड कोसळून जमीनदोस्त झाली.
या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला असून ६० जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. NDRF ची टीम, मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी दाखल झाले. तिथली परिस्थिती पाहिली, त्यांनी NDRF, आपत्कालीन विभागाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दरडग्रस्त इर्शाळवाडी इथे गावाला भेट देऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियंत्रण कक्षातून परिस्थितीचा आढावा घेतला. पालघर आणि रायगडमधील कलेक्टरशी संपर्क करून महत्त्वाच्या सूचना दिल्या आणि आढावा घेतला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी देखील परिस्थितीचा आढावा घेतला असून त्यांनी ट्विट करुन महत्त्वाची माहिती दिली आहे.
या घटनेत दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेत वाचलेल्या ग्रामस्थांना भेटून त्याना धीर दिला. त्याना लागेल ती सर्व मदत सरकारकडून केली जाईल असे सांगून त्याना आशवस्त केले.