पावसाळ्यात कांद्याचं नुकसान झालं म्हणून उन्हाळी कांदा लावला. मात्र तिथेही पदरात नुकसानच आलं. अवकाळी पावसानं काढणीला आलेला कांदाही जमीनदोस्त केला.
खरीप आणि रब्बी हंगामात झालेले नुकसान भरवाईसाठी कांद्याची लागवड केली. मात्र पावसानं सगळी वाट लावली.
गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला. दारव्हा तालुक्यात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली.
आता हा कांदा काढला आणि शेताच्या बांधावर ठेवला. अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली. येवढं पाऊस आला की शेतात पाणीच पाणी साचले.
कांदा पूर्णपणे पाण्यात बुडायला. त्यामुळे तो सडला. यामुळे शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला आहे. आता शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करत आहे.