

कोरोना विषाणूचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रावर आता चक्रीवादळाचं नवं संकट आलं आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, बुधवारी वादळ मुंबईजवळ अलिबागच्या किनाऱ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे. (फोटो – अयाज अहमद, न्यूज 18)


चक्रीवादळाचं निसर्ग हे नाव बांग्लादेशने प्रस्तावित केलं असल्याचंही हवामान खात्याने म्हटलं आहे. यावेळी वारे ताशी सुमारे 100 किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने वाहू शकतात.


3 जूनला सकाळी हे वादळ अलिबागजवळ किनाऱ्याला धडकेल. मुंबईत त्यामुळे प्रचंड पाऊस होऊ शकतो.(फोटो - एपी)


चक्रीवादळादरम्यान वीज जाण्याची शक्यता आहे. त्यात आपात्कालीन परिस्थिती उद्भवली तर नातेवाईकांकडून मदत मागता येऊ शकते. यासाठी आधीच तुमचे फोन, लॅपटॉप, बॅटरी बॅकअप चार्ज करून ठेवा.(फोटो – अयाज अहमद, न्यूज 18)


चक्रीवादळाबाबत अपडेटेड माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावरून बातम्या पाहा. अफवा पसरवू नका.(फोटो – अयाज अहमद, न्यूज 18)


धोकादायक इमारतींपासून सतर्क राहा. तुम्ही अशा इमारतीत राहात असाल तर आधीच सुरक्षित ठिकाणी शिफ्ट व्हा. त्यातून पुढे येणारा धोका टाळता येऊ शकतो.(फोटो - एपी)


चक्रीवादळादरम्यान झाडे उन्मळून पडण्याची शक्यता असते. त्यामुळे एकतर घराबाहेर पडू नका. तुमच्या आजूबाजूच्या परिसरात अशी झाडे असतील तर आधीच ती काढून टाका किंवा पालिकेला याबाबत माहिती द्या.