नाशिक शहरात उन्हाचा प्रकोप वाढला असून उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या तापमानाचा शहरातील गर्दीवर परिणाम झाला आहे. दुपारच्या वेळी बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसत आहे. नाशिकमध्ये काल 17 मे रोजी किमान तापमान 23 अंश सेल्सिअस तर कमाल 37 अंश सेल्सिअस आहे. नाशिकमध्ये आज 18 मे रोजी किमान तापमान 22 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. बुधवारच्या तुलनेत आज 1 अंश सेल्सिअसने तापमान जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिककरांना उष्णतेपासून दिलासा मिळणं अशक्य आहे.