शहारातील प्रमुख रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. या पाण्यामधून मार्ग काढण्याची कसरत काही वाहनचालक करत होते.
शहरातील प्रत्येक रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होत,विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली.मुंबईनाका,शालिमार,सीबीएस,जुने नाशिक,रामकुंड,राणे नगर,पंचवटी भागात अवघ्या 15 मिनिट झालेल्या पावसात रस्ते पाण्याखाली गेले होते.
गटारी ओव्हरफ्लो झाल्याने सर्व पाणी रस्त्यावर आल होत,पुन्हा एकदा वाहन चालकांनी गटारी नाले, सफाईवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे.
15 मिनिट झालेल्या पावसात जर नाशिक शहरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होत असेल तर,जास्त पाऊस झाल्यावर काय होईल? हा प्रश्न नाशिककर विचारत आहेत