नाशिक, 29 सप्टेंबर नाशिकमध्ये गुरूवारी दुपारी अचानक पाऊस आल्यानं सर्वांची एकच तारांबळ उडाली. शहरातील प्रमुख रस्ते या पावसामुळे जलमय झाले होते.
काही मिनिटांमध्ये आलेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी साचले होते. या पाण्यातून गाडी चालवणे वाहनचालकांसाठी अवघड बनले होते.
अशोकस्तंभ ते गंगापूर नाका या परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्या पाण्यातून वाहन चालक कशी बशी वाट काढत होते.
नाशिकमध्ये सकाळपासूनच शहरात उकाडा होता,त्यामुळे जोरदार पाऊस बरसणार अशी शक्यता जाणवत होती. अखेर दुपारी अपेक्षेप्रमाणे पावसानं जोरदार हजेरी लावली.