आदिवासी समाज जीवनातला सर्वात महत्त्वपूर्ण असलेला होळीचा सण सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये मोठ्या उत्साहात पार पडतोय. नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडामध्ये साजरी होणारी काठीची राजवाडी होळी मोठ्या थाटात संपन्न झाली. आदिवासी बांधवांनी पारंपारिक पोषाखात आणि वाद्य वाजवत होळीचा आनंद साजरा केला. 1246 पासून सुरु झालेला हा होलिकोत्सव आजही आपले एकतेतील आणि सामानातेतील वैविध्याचे रंग आणि पाम्पारिक स्वरूप कायम ठेवून आहे. सातपुड्यातील डोंगर रागांमधील काठीची राजवाडी होळीचा मोठा उत्साह असतो. आदिवासी बांधव ही होळी पारंपारिक पद्धतीनं साजरी करतात. होळी साजरी करताना आदिवासी संकृतीत पुरुष महिला असा भेदाभेद नाही. गरीब - श्रीमंत अशी आडकाठी तर मुळीच नसते. मुक्त आणि प्रसन्न वातावरणात सातपुड्यातील होळी साजरी करण्यात येते. पाच दिवस चालणाऱ्या या होळीच्या उत्सवात आदिवसी संस्कृती झलक पाहता येते. सातपुड्याच्या पर्वतरांगात होणाऱ्या होळीचा हा उत्सव अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक उपस्थित असतात. (सर्व फोटो सौजन्य : अरुण कुमार, गुजरात केडर IFS ऑफिसर)