नाशिक शहरातील शालिमार बाजारपेठ ही कपड्यांसाठी प्रसिद्ध बाजारपेठ आहे. या ठिकाणी अनेक नागरिक कपडे खरेदी करण्यासाठी येत असतात.
2/ 9
या बाजारपेठेमध्ये आता लहान मुलांचे विविध व्हरायटीचे कपडे उपलब्ध आहेत. लहान मुलांच्या विविध कपड्यांचे पॅटर्न येथील खास आकर्षण आहे.
3/ 9
या बाजारपेठेमध्ये एक दिवसापासून तर अठरा वर्षांपर्यंतचे मुलांचे कपडे आहेत. तसेच किमतीचा विचार करता 40 रुपयांपासून तर 2800 रुपयांपर्यंत कपडे या ठिकाणी उपलब्ध आहेत.
4/ 9
लहान मुलांमध्ये झबल टोपड, होजिअरी ड्रेस, टूईन वन, 5 पिस ब्लेजर, 3 पिस ब्लेजर, जीन्स, टी शर्ट या बाजारात उपलब्ध आहे.
5/ 9
मुलींमध्ये शरारा, वन पिस फ्रॉक, शॉर्ट फ्रॉक असे विविध प्रकारचे कपडे या ठिकाणी उपलब्ध आहेत, अशी माहिती कल्पराज दुकानातील विक्रेते विनोद भावसार यांनी दिली आहे.
6/ 9
ग्राहकांची आवड ही वेगवेगळी असते. प्रत्येक ग्राहकाचे काही तरी वेगळेपण असते. ग्राहकांच्या डिमांडनुसार आम्ही त्यांना कपडे उपलब्ध करून देत असतो. त्यात लहान मुलांचे विविध प्रकार आहेत, असे विक्रेते सांगतात.
7/ 9
साध्या जीन्स, टी शर्ट घेण्याकडे अनेक ग्राहकांचा कल असतो, असंही विक्रेते विनोद भावसार यांनी सांगितलं.
8/ 9
नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ही शालिमार बाजारपेठ आहे. इतर जिल्ह्यातीलही अनेक लोक कपडे घेण्यासाठी येथे येतात.
9/ 9
साधारणत: सकाळी 9 ते रात्री 11 वाजे पर्यंत ही बाजारपेठ चालू असते. त्या वेळेत आपण या ठिकाणी कपडे खरेदी करू शकतो.