एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. परंतु, एका तिळाचे 100 भाग केले असं म्हटलं तर आपला विश्वास बसणार नाही.
यवतमाळमधील तरुणाने ही किमया करून दाखवली आहे. एका तिळाचे 100 तुकडे केल्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही झाली आहे.
पुसद येथील रहिवासी असणारा अभिषेक रुद्रवार हा सूक्ष्म कलाकृती तयार करतो. त्याने आजवर अनेक लहान कलाकृती तयार केल्या आहेत.
गेल्या 4 वर्षांपासून अभिषेक ही कला जोपासत असून 1 हजारहून अधिक कलाकृती तयार केल्याचे त्याने सांगतिले.
अभिषेक आपल्या या अनोख्या कलेचे इतरांनाही प्रशिक्षण देत आहे. तसेच विविध ठिकाणी प्रदर्शनही भरवले आहे. मात्र, त्याला अद्याप मोठे व्यासपीठ मिळाले नाही, अशी खंत तो व्यक्त करतो.
एका तिळाच्या दाण्यावर त्याने छत्रपती शिवाजी महाराज रेखाटले आहेत. तर मोहरीवर गणपती, तांदळाच्या दाण्यावर A ते Z अक्षरे लिहली आहेत.
जगातील सर्वात सुक्ष्म तिरंगा, पेन्सिलच्या टोकावर अष्टविनायक, शिवाजी महाराज, तुळजाभवानी यांची मूर्ती कोरली आहे.
अभिषेकने तयार केलेले अक्षर गणेश, सर्वात सूक्ष्म निसर्ग चित्र, गवताच्या एका पानावर गणपती, तांदळाच्या दाण्यावर गणपती ही आकर्षक आहेत.