समृद्धी महामार्गाचं कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं, पण या लोकार्पणाच्या 24 तासांमध्येच महामार्गावर अपघात झाला आहे. (Samruddhi Highway Accident)
वायफळ टोलनाक्यावर एक कार हळुवार जात असताना मागून आलेल्या दुसऱ्या कारने जोरदार धडक दिली, यामध्ये टोलनाक्यावर समोर असलेल्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. (Samruddhi Highway Accident)
आज दुपारी झालेल्या या अपघातात कोणीही जखमी झालं नाही, पण दोन्ही कारचं मात्र मोठं नुकसान झालं आहे. (Samruddhi Highway Accident)
कालच समृद्धी महामार्गाच्या वायफळ टोलनाक्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केलं. आज याच ठिकाणी अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गावरचा हा पहिलाच अपघात असावा. (Samruddhi Highway Accident)
नागपूर ते शिर्डी या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आलं. (Samruddhi Highway Accident)