सर्वत्र उन्हाळ्याची चाहूल लागली असून वातावरणातील तापमान देखील वाढत आहे. या उष्णतेच्या झळा मनुष्यांप्रमाणेच वन्यजीवांना देखील सोसाव्या लागत आहेत
चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा बफर वनक्षेत्रात वाघाचे संपूर्ण कुटुंब पाण्याच्या शोधात पाणवठयावर आले होते.
वाघाची एक झलक मिळावी पर्यटक आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र एकाच ठिकाणी वाघाचे संपूर्ण कुटुंब बघायला मिळणं हा म्हणजे दुग्धशर्करा योगचं म्हणावा लागेल.
भल्या भल्यांना भुरळ पाडणाऱ्या पट्टेदार वाघोबांच्या दर्शनासाठी विदर्भात असलेले ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे सर्वांच्याच आवडीचे ठिकाण आहे.