गडचिरोली जिल्ह्यामध्ये काल रात्री पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आला आहे.
त्यामुळे आलापल्ली भामरागड मार्ग बंद झाला आहे. नदी नाल्याला पुर आल्याने जिल्ह्यातील 8 मार्ग बंद झाले आहेत.
सर्वत्र जोरदार पडत असलेल्या पावसाने गडचिरोली जलमय झाले असून रस्ते पूर्णतः पाण्याखाली गेले असल्याने प्रवसाचा मार्गच बंद झाला आहे.