गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं. असाच काहीसा प्रकार लातूरमधील दयानंद दरेकर यांच्या बाबतीत घडला.
2/ 11
परंपरागत मंडपाचा व्यवसाय करत असतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यासाठी दरेकर यांनी थेट चालते फिरते मंगल कार्यालय तयार करण्याचा निर्णय घेतला.
3/ 11
दरेकर यांच्या या कल्पनेची सुरुवातीला अनेकांनी चेष्टा केली. पण दरेकर यांनी निश्चय करून आपली चालते फिरते मंगल कार्यालय सुरू करण्याची कल्पना प्रत्यक्षात आणलीच.
4/ 11
एका ट्रक मध्ये दरेकर यांनी मंगल कार्यालयाची सुरुवात केली. यात एसी हॉल, साऊंड सिस्टीम, स्टेज व अत्याधुनिक सर्व सोई सुविधा आहेत. हॉलची साइज 30x40 फूट असून खुर्चीवर 150 ते 200 लोक सहज बसू शकतात.
5/ 11
आज मंगल कार्यालयात लग्न करायचे म्हटले तर तीन ते पाच लाखांचा खर्च सहज होतो. पण या मोबाईल मंगल कार्यालयामुळे हाच खर्च तीस ते चाळीस हजारात भागत आहे.
6/ 11
या मोबाईल मंगल कार्यालयात लग्न समारंभ, नामकरण सोहळा, हळदी कुंकू कार्यक्रम, वाढदिवस असे कौटुंबिक कार्यक्रम करता येतात.
7/ 11
स्नेह संमेलन, सेमिनार, स्टेज शो, स्वागत समारंभ असे राजकीय शैक्षणिक कार्यक्रमही करता येतात. त्यासाठी हे मोबाईल मंगल कार्यालय पाहिजे तिथे घेऊन जाता येते.
8/ 11
कोणताही कार्यक्रम असला तर एक कॉल करून मंगल कार्यालयच कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलावता येते. 'मंडपाच्या दरात मंगल कार्यालय दारात' योजनेमुळे या अनोख्या मंगल कार्यालयाची खूप चर्चा होतेय.
9/ 11
दरेकर यांच्या या अफलातून संकल्पनेची चर्चा देशभर झाली. अगदी उद्योजक आनंद महिंद्रा यांनी देखील या मोबाईल मंगल कार्यालयाची दखल घेतली आहे.
10/ 11
आनंद महिंद्रा यांनी दरेकर यांना भेटीसाठी बोलावून घेत या कल्पनेबाबत माहिती घेतली. या प्रोजेक्टवर काम करण्याचा मानस दाखवला असून ही संकल्पना म्हणजे येणाऱ्या काळात अनेक लोकांचा वेळ वाचवेल, असे महिंद्रा म्हणाले.
11/ 11
लोकांचा या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात चालते फिरते मंगल कार्यालय सुरू करायचे आहे. जेणेकरून लग्नाचा खर्च कमी होऊन सर्वसामान्यांना त्याचा फायदा होईल, असे दरेकर सांगतात.