कोल्हापूर, 26 जानेवारी : कोल्हापुरात प्रजासत्ताक दिन हा जिलेबीशिवाय साजराच होत नाही. शहरातल्या चौकाचौकात जिलेबी खाण्यासाठी कोल्हापूरकर एकत्र आले होते.
प्रजसत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्वत्र देशभक्तीपर वातावरण पाहायला मिळते. कोल्हापूरमध्येही सर्वत्र 26 जानेवारीच्या कार्यक्रमाची लगबग होती.
कोल्हापूरकरांनी दरवर्षीप्रमाणे जिलेबीच्या स्टॉलवर गर्दी केली. . प्रत्येकजण जिलेबी घरी घेऊन जाण्यासाठी स्टॉलवर आले होते.
प्रजासत्ताक दिनी घराबाहेर पडलेले नागरिक गरमागरम जिलेबी घेऊनच परततात. ही कोल्हापूरकरांची परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात या एकाच दिवशी साधारण 90 हजार किलो जिलेबी कोल्हापूरकरांकडून फस्त केली जाते, अशी माहिती जिलेबी विक्रेत्याने दिली.