कोल्हापूर शहरातील दुभाजक, आयलँड, पुतळ्यांची स्थिती ही दयनीय बनली आहे. शहरातील पर्यटन वाढीसाठी पावले उचलण्याची गरज असताना ही ठिकाणं मात्र धूळ, गवत, झाडी आणि कचरा यांच्यामुळे झाकोळली गेली आहेत.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाकडे जाणाऱ्या मार्गावर दुभाजक म्हणून झाडे लावण्यात आलेली आहेत. या दुभाजकाचीही नीट निगा राखण्यात आलेली नाही.
गोकुळ हॉटेल शेजारी असणाऱ्या श्रीपतराव बोंद्रे त्यांच्या पुतळ्याखाली झाडांच्या कुंड्या ठेवून हे ठिकाण सुशोभित करण्यात आले आहे. पण कुंड्यांमध्ये लावण्यात आलेली झाडे पूर्णपणे सुकून गेली आहेत.
मध्यवर्ती बस स्थानक परिसरात असणाऱ्या आयलँडची झाडांच्या वाढीमुळे अवस्था तर वाईट बनली आहेच. पण त्यातही या ठिकाणी कचरा टाकण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालय, कोल्हापूर या परिसरात असणाऱ्या चौकात कॉर्नर झाडे लावून सुशोभित करण्यात आला आहे. त्याच्यातही गवत वाढल्यानं सर्व शोभा गेली आहे.
ऐतिहासिक बिंदू चौक ते मिरजकर तिकटी रस्त्यावर असणारा अल्लादियाँ खांसाहेब यांचा पुतळा आहे. त्याच्या आजूबाजूला सर्वत्र पालापाचोळा पडला आहे. हा पुतळा देखील नेहमी धुळीने माखलेला असतो.
व्हिनस कॉर्नर ते स्टेशन रोड या रस्त्यावरील दुभाजकामध्ये गवताचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर या ठिकाणची झाडी भरपूर वाढली आहेत.