कोल्हापूरच्या गड्याचा नाद खुळा! सातवीच्या मुलाचा भारतीय खेळाडूंवर दाव, मिळाले 1 कोटी
कोल्हापूरमधल्या सातवीतल्या विद्यार्थ्याला 1 कोटी रुपये मिळाले आहेत. भारत-न्यूझीलंड तिसऱ्या वनडेमध्ये या मुलाने ऑनलाईन गेममध्ये सहभाग नोंदवला, ज्यामुळे त्याच्यावर पैशांचा वर्षाव झाला आहे.
कोल्हापूरमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलाला बंपर लॉटरी लागली आहे. ऑनलाईन गेममधून त्याने तब्बल 1 कोटी रुपये कमावले आहेत. मुरुगड इथल्या सक्षम कुंभार याने ही कामगिरी केली आहे.
2/ 8
ऑनलाईन गेममध्ये सक्षम कुंभार निष्णात होता, त्यातून त्याने हे यश मिळवलं आहे. मंगळवारी भारत-न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यावर सक्षमने पैसे लावले होते.
भारत-न्यूझीलंड सामन्यामध्ये रोहित शर्मा, शुभमन गिल आणि डेवॉन कॉनवे यांनी शतकं केली. शार्दुल ठाकूरला उत्कृष्ट ऑलराऊंडर कामगिरीबद्दल मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. हार्दिक पांड्यानेही अर्धशतक करत विकेट घेतल्या.
5/ 8
सक्षम कुंभार याने निवड केलेल्या प्रत्येक खेळाडूनेच धमाकेदार कामगिरी केली, ज्यामुळे त्याच्यावर पैशांचा वर्षाव झाला आहे.
6/ 8
ऑनलाईन गेममधून पैसे मिळाल्यानंतर सक्षम कुंभार याची कोल्हापुरातून मिरवणूकही काढण्यात आली.
7/ 8
सक्षम कुंभार याला 1 कोटी रुपये मिळाले असले तरी टॅक्स कट होऊन त्याच्या खात्यात 70 लाख रुपये जमा झाले आहेत.
8/ 8
ऑनलाईन गेम हे एक व्यसन आहे, यामध्ये पैसे गमावण्याचा धोकाही आहे. न्यूज 18 ऑनलाईन गेम खेळण्यास प्रोत्साहन देत नाही. प्रत्येकाने स्वत:च्या जोखमीवरच ऑनलाईन गेम खेळावेत.