advertisement
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / उंच झाडाखाली थांबू नका, शॉवरखाली आंघोळ करू नका, पावसाळ्यात ही घ्या काळजी, PHOTOS

उंच झाडाखाली थांबू नका, शॉवरखाली आंघोळ करू नका, पावसाळ्यात ही घ्या काळजी, PHOTOS

जालना जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात शॉवरखाली अंघोळ करणे देखील धोकादायक असून पाहा आणखी काय घ्यावी खबरदारी..

  • -MIN READ

01
 महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावासाने जोरदार हजेरी लावली आहे. या कालावधीमध्ये वीज कोसळणे, दरड कोसळणे यासारखे धोके निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावासाने जोरदार हजेरी लावली आहे. या कालावधीमध्ये वीज कोसळणे, दरड कोसळणे यासारखे धोके निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे जालना येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

advertisement
02
विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळया जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.

03
आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.

04
आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

05
आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली आंघोळ करु नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करु नका. तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.

06
विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. तसेच धातूंच्या उंच मनो-याजवळ उभे राहू नका.

07
जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) केशव नेटके यांनी केले आहे.

08
जालना जिल्ह्यातही 22 जुलै रोजी कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्राने यलो अलर्ट जारी केला आहे. तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

09
तसेच दि. 23 ते 25 जुलै 2023 या कालावधीत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधीत यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.

  • FIRST PUBLISHED :
  •  महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावासाने जोरदार हजेरी लावली आहे. या कालावधीमध्ये वीज कोसळणे, दरड कोसळणे यासारखे धोके निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे <a href="https://lokmat.news18.com/maharashtra/jalna/">जालना </a>येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

    MORE
    GALLERIES