एरंडोल तालुक्यातील तळई येथे चंपाषष्ठी निमित्त खंडेराव महाराज यांची यात्रा भरते. या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून बारा गाड्या ओढण्याची परंपरा आहे.
आज 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ध्वज काठीची धनगर मढी पासून विधिवत पूजा करून भगत समाधान भगवान पाटील यांचे सह इतर नागरिकांनी बारा गाड्या ओढण्यास सुरुवात केली.
बारा गाड्यांच्या साईडला असलेल्या चाकांकडून इतर युवक व नागरिक हे या बारा गाड्यांना पुढे ढकलत होते. दुर्दैवाने बारागाड्या ओढाताना बैलगाडीचे चाक अंगावरुन गेल्याने राहुल पंडित पाटील या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
बारागाड्या ओढताना गर्दीमुळे तरुण गाड्याखाली ढकलला गेला व त्याच्या पोटावरून बैलगाडीचे चाक गेल्याने गंभीर अवस्थेत तरुणास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.