मुंबई श्री राहिलेला आणि जिममध्ये ट्रेनिंग देण्याचे काम करणाऱ्या संकल्प भाटकर या तरुणाने आपल्याच जन्मदात्या आई-वडिलांवर चाकूने सपासप वार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या आईचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर वडिलांवर उपचार सुरू आहे (अजित मांढरे, प्रतिनिधी)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकल्प भाटकर असं माथेफिरू तरुणाचं नाव आहे. संकल्पने आठवड्यापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून वृद्ध आई वडिलांवर जीवघेणा हल्ला केला होता.
या हल्ल्यात वडील विलास मुकुंद भाटकर (77) आणि आई विनिता विलास भाटकर (66) यांच्यावर घरातील धारधार चाकूने सपासप वर केले होते. या भीषण हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी होते. आई विनिता यांचा मृत्यू झाला आहे तर वृद्ध वडील विलास यांच्यावर घोडबंदरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आई वडिलांवर हल्ला केल्यानंतर संकल्प भाटकर हा मोटारसायकल घेऊन फरार झाला होता. कासारवडवली पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस पथके निर्माण केली आणि काही तासातच आरोपीला नेहरू नगर कुर्ला मुंबई येथून अटक केली होती. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
डॉक्टरांच्या मते जास्त कालावधीसाठी स्टेरॉईड घेतल्याने त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात. यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढते, स्ट्रेस वाढतो, मूड स्विंग आणि बेचैनी वाढते, चिडचिडेपणा वाढतो, अपचन, छातीत जळजळ, भूक वाढणे, वजन वाढणे अशा समस्या व्हायला लागतात.
स्टेरॉईड घेताना जशी काळजी घ्यावी लागते तसंच, स्टेरॉईड बंद करतानाही खबरदारी घ्यावी. स्टेरॉईड बंद करताना त्याचं प्रमाण हळूहळू कमी करून बंद करावं लागतं. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टेरॉईड अचानक बंद केल्यास दुष्परिणाम होतात.