रवी सपाटे, गोंदिया प्रतिनिधी, 29 जुलै : गोंदियात एक दुर्दैवी घटना घडली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मुलं अशीच शेळ्यांच्या मागोमाग गेली.
गोंदिया जिल्हामध्ये सर्वत्र पावसाची दमदार हजेरी लावली नसली तरी मात्र जिल्हा मध्ये नदी, नाले कमी जास्त प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
दुसरीकडे कारणाशिवाय घराबाहेर पडू नये असं सांगितलं जात असताना दोन मुलं शेळ्यांना चरायला घेऊन गेली. घात झाला दोन मुलं नाल्याच्या पाण्यात वाहून गेली आहेत.
आर्यन शैलेश कुमार शहारे, गंगाधर भिवाजी भरणे दोन्ही राहणार मुंडीपार तालुका जिल्हा गोंदिया दोन मुलं वाहून गेली आहे.
स्थानिक लोकांच्या माध्यमातून यांचे प्रयत्न बाहेर काढण्यात आले असून पोस्टमार्टम करता पाठवण्यात आले आहे.