मिस्त्री यांची मर्सिडीज गाडी डिव्हायरडला धडकल्याने भीषण अपघात झाला होता. या दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.
उद्योगपती सायरस मिस्री यांचा हा अपघात पालघर जिल्ह्यात झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला, याबाबतची माहिती पालघर पोलीस जिल्हा अधीक्षकांनी दिली आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर महाराष्ट्रातील पालघर येथे हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की कारचेही मोठे नुकसान झाले. तसेच कारमधील इतर लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात सुप्रीम कोर्टाने टाटा सन्सला सर्वात मोठा दिलासा देत सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय कायम ठेवला होता. गेल्या अनेक वर्षांपासून टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सायरस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये न्यायालयीन संघर्ष सुरू होता.