कोरोनाशी लढण्याचा राज्य सरकारचा हा आहे अॅक्शन प्लॅन
Coronavirus चे रुग्ण वाढत आहेत. देशातल्या अॅक्टिव्ह पेशंट्सपैकी निम्मी संख्या महाराष्ट्रात आहे. या नव्या लाटेचा सामना करायला राज्य सरकारचा प्लॅन आहे याची कल्पना कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. लॉकडाउन होणार का, शाळा, लोकल पुन्हा बंद होणार का?
|
1/ 8
मास्क वापरण्याची सक्ती आणि त्याच्या अंमलबजावणीचं काम स्थानिक प्रशासनाकडे
2/ 8
अर्थकारणाला लॉकडाउन परवडणार नाही, त्यामुळे संपूर्ण टाळेबंदी नाही. पण गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर
3/ 8
मुंबईच्या लोकलच्या फेऱ्या कमी करून आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच पुन्हा लोकल सुरू ठेवण्याचा विचार होऊ शकतो, असं कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
4/ 8
कार्यालयांच्या वेळा बदलून लोकल, बस आणि रस्त्यावरची गर्दी कमी करणं.
5/ 8
एसटी बसमधली गर्दी कमी करण्याचा प्रयत्न. त्यासाठी विविध शक्यतांचा विचार राज्य सरकार करत आहे.
6/ 8
सिनेमागृहे- मंगल कार्यालयात होणाऱ्या गर्दीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश
7/ 8
गरज पडली तर शाळा पुन्हा बंद करणार
8/ 8
दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे व ऑनलाईन परीक्षा घेणे याबाबतही चाचपणी सुरू