छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील बडवे कंपनीसमोर शिवशाही बसचा अपघात झाला. (अविनाश कानडजे, प्रतिनिधी)
अपघातामध्ये शिवशाही बस चालक गंभीर जखमी झाले असून चालकाला छत्रपती संभाजी नगर घाटी रुग्णालयात दाखल केले आहे.
पुण्याहून छत्रपती संभाजीनगरकडे शिवशाही बस जात होती. यावेळी बसमध्ये 35 प्रवासी प्रवास करत होते. यापैकी 35 पैकी तेरा प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती.
सुदैवाने या अपघातात जीवितहानी कोणतीही नाही. मात्र, प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातामध्ये बसचा समोरचा भाग चुरा झाल्याचे दिसून येते.