गेल्या काही काळापासून समृध्दी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. बुलढाण्यातील अपघात ताजा असातानाच समृद्धी महामार्गावर सोमवारी पुन्हा एक अपघात झाला.
छत्रपती संभाजीनगर एकाच दिवशी तीन विविध ठिकाणी झालेल्या अपघातांनी हादरलं. समृध्दी महामार्गावर करमाड हद्दीत भामरडा शिवरात भरधाव कार दरीत कोसळली.
एसयुव्ही कारमधून थोरात कुटुंबीय शिर्डीहून अकोलाकडे जात होते. करमाड हद्दीत चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
या अपघातात एक जण ठार तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. सुशील दिलीप थोरात असे मृताचे नाव आहे. तर मुलगी बबिता सुशील थोरात व पत्नी गीता सुशील थोरात गंभीर जखमी आहेत.
जिल्ह्यातील दुसऱ्या एका ठिकाणी जिल्ह्यात प्रवासी बस पलटी होऊन भीषण अपघात झाला. ही बस छत्रपती संभाजी नगर ते नंदुरबार प्रवाशांना घेऊन जात होती.
या बसमधून 20 ते 24 प्रवासी प्रवास करीत होते. चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
जिल्ह्यातील गंगापूर वैजापूर रोडवर थोरात पेट्रोल पंपाच्या समोर दुचाकी अपघात झाला. यात दुचाकीवर स्वार असलेले दोन तरुण जागीच ठार झाले.