दागिने घालून मिरवायला बहुतेक महिलांना आवडतं. आता लवकरच सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात अनेक सण असतात. सण लहान असो वा मोठा, कार्यक्रम घरगुती असो किंवा सार्वजनिक त्या दिवशी आपल्या कपड्यांना मॅचिंग दागिने घालण्याची महिलांची इच्छा असते.
तुम्ही अस्सल मोत्यांचे पारंपारिक दागिने शोधत असाल तर छत्रपती संभाजीनगरमधील एक ठिकाण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
संभाजीनगरमधील औरंगपुरा भागातील सोनचाफा या दुकानामध्ये तुम्हाला मोत्याचे दागिने खरेदी करता येतात. बुगडी, चिंचपेठ, 11 पेटी चिंचपेठ, बांगड्या, तोडे, पैंजण, वेणी, मोत्याचे कानातले, झुमके, टॉप्स, तन्मणी, मोत्यांचे हार, चोकर, मंगळसूत्र, नथनी, कंबरपट्टा, ब्रासलेट, बाजूबंद असे वेगवेगळे दागिने इथं खरेदी करता येतात.
अधिक महिना, श्रावण महिन्यातील मंगळागौर आणि अन्य सण त्याचबरोबर त्यानंतर येणाऱ्या गौरी गणपतीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोत्याचे दागिने आमच्याकडं उपलब्ध आहेत,अशी माहिती येथील कर्मचारी पूजा पिंपळे यांनी दिली.
येथील बुगडीची किंमत ही 125 ते 500 या दरम्यान आहे. तर चिंचपेटी 3 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येते. झुमक्याचा दर दीडशे रुपयांपासून सुरू होऊन 400 ते 500 रुपयांपर्यंत मिळतो.
चार बांगड्या, मोत्याचं मंगळसूत्र, मोत्याची बुगडी, आणि मोत्याचा बाजूबंद असा सेटही इथं उपलब्ध असून त्याची किंमत 795 रुपये इतकी आहे, अशी माहिती पिंपळे यांनी दिली.