advertisement
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / हंडाभर पाण्यासाठी आई पायपीट करायची, प्रणयने थेट घरासमोरच खोदली 18 फुटांची विहीर PHOTOS

हंडाभर पाण्यासाठी आई पायपीट करायची, प्रणयने थेट घरासमोरच खोदली 18 फुटांची विहीर PHOTOS

आईची पाण्यासाठी होणारी पायपीट बघवत नसल्याने 14 वर्षाच्या चिमूकल्याने शेतीच्या अवजारांच्या मदतीने घराच्या आवारातच 18 फूट खोल विहीर खोदली आहे.

01
पाण्यासाठी आईची होणारी वणवण बघवत नसल्याने पालघर मधील केळवे धावंगेपाडा येथील आठवी शिकणाऱ्या चिमुकल्याने चक्क आपल्या घराच्या आवारातच विहीर खोदून आपल्या कुटुंबांचा पाणी प्रश्न सोडवला आहे. (राहुल पाटील, प्रतिनिधी)

02
केळवेतील धावांगे पाडा येथील प्रणय रमेश सालकर याच्या या अनोख्या कार्यामुळे त्याच्यावर सध्या परिसरात कौतुकाचा वर्षाव होतोय.

03
पालघर मधील केळवे मधील धावांगेपाड्यातील हे सालकर दांपत्य. दर्शना आणि रमेश हे दोन्ही पती पत्नी बागायतदार वाडीत मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

04
मोलमजुरी करून संध्याकाळी घरी परतल्यावर दर्शना यांना आपल्या कुटुंबासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती.

05
मात्र, आईची ही पाण्यासाठी रोजची होणारी धावपळ मुलगा प्रणय याला बघवली नाही. शेवटी अवघ्या 14 वर्षाच्या प्रणयने आपल्या घराच्या आवारातच विहीर खोदण्याचा निर्णय घेतला.

06
ठरल्याप्रमाणे प्रणयने घराच्या आवारातच विहिरीच खोदकाम करण्यास सुरुवात केली. घरातील शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांचा वापर करत प्रणयने चार दिवसात 18 फुटांपेक्षाही जास्त खोल विहीर खोदली. अखेर या विहिरीला 18 फूटानंतर पिण्या योग्य पाणी लागलं आणि प्रणयची मेहनत सफल झाली.

07
प्रणयने केलेली जिद्द, हिम्मत आणि मेहनत यांच्या जोरावर आपल्या आईचा पाण्यासाठी होणारा त्रास कमी केला. या सगळ्यामुळे चिमुकल्या प्रणयचही त्याच्या आई-वडिलांना कौतुक आहेच. शिवाय आपली पाण्यासाठी होणारी पायपीट कमी झाल्याने प्रणयची आई दर्शना यांनी देखील समाधान व्यक्त केल आहे.

08
आईची पाण्यासाठी होणारी धगधग पाहून प्रणयने 18 फुटांचा खोल खड्डा खोदत आपल्या आईचा त्रास कमी केला.

09
प्रणयने केलेली ही गोष्ट जगावेगळी नसली तरी त्याच्या हिम्मत आणि मेहनतीचं आज सर्वत्र कौतुक केलं जातं आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • पाण्यासाठी आईची होणारी वणवण बघवत नसल्याने पालघर मधील केळवे धावंगेपाडा येथील आठवी शिकणाऱ्या चिमुकल्याने चक्क आपल्या घराच्या आवारातच विहीर खोदून आपल्या कुटुंबांचा पाणी प्रश्न सोडवला आहे. (राहुल पाटील, प्रतिनिधी)

    MORE
    GALLERIES