एकिकडे राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आहे. पण तरी राज्यावरील कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही.
2/ 10
फक्त पाच जिल्ह्यांनी राज्याचं टेन्शन वाढवलं आहे. या पाच जिल्ह्यांमधील कोरोनाचा पॉझिटिव्ही रेट हा राज्याच्या सरासरी पॉझिटिव्हीटी रेटपेक्षाही जास्त आहे.
3/ 10
पॉझिटिव्ही रेट म्हणजे एकूण चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचं प्रमाण आणि याच पॉझिटिव्ही रेटवर अनलॉकसंबंधी नियम अवलंबून आहेत.
4/ 10
27 जून ते 3 जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार संपूर्ण राज्याचा आठवड्याचा सरासरी पॉझिटिव्ही रेट 4.50 टक्के आहे.
5/ 10
कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, पुणे या पाच जिल्ह्याचा आठवड्याचा पॉझिटिव्ही रेट हा राज्याच्या सरासरी पॉझिटिव्ही रेटपेक्षाही जास्त आहे.
6/ 10
याच आठवड्यात सोलापुरातील पॉझिटिव्हिटी रेट हा 10.24 टक्के आहे. याआधीच्या आठवड्यात म्हणजे 20 ते 26 जूनला हा दर 7.37 टक्के होता.
7/ 10
साताऱ्यातील आठवड्याचा पॉझिटिव्ही दरही गेल्या आठवड्याच्या 7.75 टक्क्यांवरून आता 9.14 टक्क्यांवर पोहोचला आहे.
8/ 10
त्यानंतर सांगलीचा पॉझिटिव्ही रेट हा 8.81 टक्के आहे.
9/ 10
पुण्यातील पॉझिटिव्ही रेट हा गेल्या आठवड्यापेक्षा किंचितसा वाढला आहे. पण तरी यामुळे चिंता वाढली आहे. 7.2 टक्क्यावरून तो 7.68 टक्क्यांवर आला आहे.
10/ 10
फक्त पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर आता कोकणानेही चिंता वाढवली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अनुक्रमे 7.88, 7.29, 6.55 टक्के पॉझिटिव्ही रेट आहे, जो सरासरीपेक्षा जास्त आहे.