वाशिम जिल्ह्यातील मनोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे संत श्री सेवालाल महाराज यांच्या 21 फुटी पंचधातूचा अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
21 फुटी पंचधातूचा अश्वारूढ पुतळ्यासोबत 135 फुट उंच धवल सेवाध्वजाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
यावेळी वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार ॲड. निलय नाईक, बंजारा समाजाचे धर्मगुरु महंत बाबूसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, शेखर महाराज आदी उपस्थित होते.
वसंतराव नाईक महामंडळाला कधीही पैसे कमी पडून देणार नाही, तसेच हे सरकार आणि शासनाची जबाबदारी आहे. शासन तुमच्या समाजाच्या पाठी उभा आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.