तुम्ही कधी कुणाला प्रपोज केलं आहे का? किंंवा कुणी तुम्हाला सोबत आयुष्य घालवण्याची स्वप्नं दाखवली असतील. मात्र केवळ माणसंच नाही प्राणीही एकमेकांना प्रपोज करतात.
जिराफ: जिराफ अगदीच विचित्र पद्धतीनं प्रपोज करतो. नर जिराफ मादी जिराफाच्या पोट आणि शरीराच्या मागच्या भागाला आपलं पोट घासतो. मग मादी जिराफाची लघवी होते. त्यानंतर नर जिराफ या लघवीचा रंग आणि वासावरून ठरवतो की ही मादी आपली जीवनसाथी बनण्यासाठी लायक आहे की नाही.
2. हंस : हंसाची जोडी म्हणजे प्रेमाचं प्रतिक मानलं जातं. हंस कमी वयातच 2 वर्षांचे असताना जीवनसाथी निवडतात. ते पाण्यात नृत्य करून एकमेकांना आकर्षित करतात.
3. बेट्टा मासा : हा खास मासा आहे. जेव्हा नर माशाला वाटतं, की मादी मासा त्याची पार्टनर बनायला तयार आहे तेव्हा तो हवेचा बुडबुडा बनवतो. आणि त्या बुडबुड्यात यावं म्हणून मादी मासळीची मनधरणी करतो. तिनं नाही म्हणल्यास तो तिच्यासोबत हिंसाही करतो. शेवटी मादी बुडबुड्यात आल्यावर अंडा देते. त्यानंतर तो अंड्यांचं रक्षण करतो.
4. भालू : अस्वलांची ही जात आळशी असते. आपला जीवनसाथी निवडण्याची जबाबदारी माद्यांवर असते. मादी प्रजननासाठी तयार झाल्यावर नरांना ओरडून आकर्षित करते. नर इतर नरांना पळवून लावत तिच्याशी रत होतो.
6. बेडुक : बेडकी आपल्या पार्टनरचा रंग, घरटं बनवण्याची पद्धत किंवा बेडकाची सोबत राहण्याची पद्धत यावरून त्याला निवडायचं की नाही ते ठरवते. मात्र सर्वात महत्त्वाची असते बेडकाच्या ओरडण्याची पद्धत. सगळे बेडुक कुस्ती करतात. जो जिंकतो त्याच्यासोबत मादी बेडुक राहते.
7. पेंग्विन : पेंग्विन खूपच प्रेमळ असतात. सांगितलं जातं, की आयुष्यभर ते एकाच पार्टनरसोबत सगळं आयुष्य घालवतात. पार्टनरला प्रपोज करताना नर पेंग्विन फिल्मी पद्धतीनं मादीच्या पायावर डोकं ठेवतात.