उच्च रक्तदाबाची लक्षणे प्राथमिक पातळीवर दिसत नाहीत, मात्र तो शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना हानी पोहोचवत असतो. म्हणून त्याला सायलेंट किलर म्हणतात.
छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, डोके जड होणे, कमीत कमी हालचालींनीही थकवा जाणवणे, डोळ्यांसमोर वारंवार अंधारी येणे, अस्वस्थ वाटणे, थाप लागणे ही उच्च रक्तदाबाची लक्षणं आहेत.
उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात पौष्टिक घटकांचा समावेश करणे गरजेचं आहे. यात धान्य, ताजी फळे, भाज्या आणि कमी चरबीयुक्त डेअरी पदार्थांचा समावेश असावा.
मॅग्नेशिअम, पोटँशिअम, कॅल्शिअमयुक्त फळे आणि भाज्यांचे सेवन करा. केळी, डाबिंळ, मोसंबी, द्राक्षे, पपई तसेच पालक, टोमँटो, बीड, मेथी, कांदा, आवळा, लसून हे पदार्थ खावेत.
जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्याने रक्तप्रवाहामध्ये सोडियमचे प्रमाण वाढू शकते आणि मूत्रपिंडांमधून पाण्याची वाहण्याची क्षमता कमी होते. यामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो. अन्नामध्ये अतिप्रमाणात मिठाचा वापर टाळावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यकतेनुसार मिठाचा आहारात समावेश करा.
अतिमद्यपान आणि धूम्रपान म्हणजे उच्च रक्तदाबाला निमंत्रणच असते. त्यामुळे शक्यतो धूम्रपान आणि मद्यपान करणं शक्यतो टाळावं.
दररोज व्यायाम केल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात मदत मिळते. त्यामुळे कमीत कमी अर्ध्या तासासाठी व्यायाम करा. चालणे, पळणे, पोहणे, सायकलिंग आदी व्यायाम करता येतील. आठवड्यातून किमान दोन वेळी तरी वेळातरी वेट ट्रेनिंग करावे. नियमित व्यायाम करूनही वजन कमी होत नसेल, तरी उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी तो फायदेशीर आहे हे लक्षात ठेवावे.
दैनंदिन जीवनातील ताणतणावामुळे रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे आपल्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढून आराम करा. आपल्या आवडीच्या क्रिया- जसे, वाचन करणे, गायन करणे आणि बागकाम करा, यामुळे तुम्हा सतत कुठल्या ना कुठल्या कामात व्यस्त राहिल्याने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरेल.
आपण सतत अर्ध्या तासापेक्षा जास्त बसू नये, थोडा वेळ उठवू पाय मोकळे करावेत किंवा थोडी शारीरिक हालचाल करावी. अर्धा तास बसून आणि अर्धा तास उभे राहून काम केलेले सगळ्यात उत्तम.
जास्तीत जास्त घरकामे स्वतः करावीत, शारीरिक हालचाल वाढली तर आपला रक्तदाब नियंत्रणात यायला मदत मिळते.