सनस्क्रीम केवळ उन्हाळ्यातच नाही तर पावसाळ्यातही त्वचेचे संरक्षण करण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. तेव्हा त्वचेला सूर्याच्या किरणांपासून वाचवण्यासाठी तुमच्या बागेत सनस्क्रीम असायलाच हवे.
पावसाळ्यात भिजण्यापासून संरक्षण करण्यासाठी बॅगेत नेहमी छत्री कॅरी करा. अन्यथा अचानक पाऊस आल्याने तुम्ही भिजू शकता.
छत्री असूनही काहीवेळा पावसात अंग ओले होते. अशावेळी तुम्ही अंग पुसण्यासाठी छोटा नॅपकिन रुमाल बॅगेत असायलाच हवा.
पावसाळ्यात अनेकदा महिला कामाला जाण्यासाठी ट्रेन, बस, रिक्षा यामधून प्रवास करतात. अशावेळी पावसाचे पाणी पडून सीट ओली होते. तेव्हा बॅगेत सुका फडक असल्यास सीट वरील पाणी पुसून तुम्ही कोरड्या जागेवर बसू शकता.
अनेकदा धावपळीमुळे अंगाला घामाचा वास येऊ लागतो. तेव्हा महिलांनी बॅगेत नेहमी परफ्युम अथवा डिओड्रंट स्प्रे करी करावा.
शरीराला नेहमी हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणे गरजेचे आहे. तेव्हा तुमच्या बॅगेत पाण्याची बॉटल असायलाच हवी.
मुसळधार पावसात तुम्ही ऑफिसला जात असाल तर कपडे भिजण्याची शक्यता असते. पावसात ओले कपडे लवकर सुकत नाहीत आणि अनेकदा यामुळे स्किन इंफेक्शन होण्याचा धोका असतो. अशावेळी तुम्ही घरातून निघताना बॅगेत कपड्यांचा एक जोड कॅरी करू शकता.
लिपस्टिक हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. अनेकदा पावसाळ्यात काही लिपस्टिक फारकाळ टिकत नाहीत. तेव्हा तुम्ही वॉटरप्रूफ लिपस्टिक बॅगेत ठेवा.
पावसाळ्यात वारंवार घाम आणि भिजल्यामुळे चेहरा चिकट होतो. त्यासाठी बीबी पावडर बॅगमध्ये कॅरी करणे बेस्ट ऑप्शन आहे. बीबी पावडर बॅगमध्ये जरुर ठेवा.